ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी नगरसेवक नंदू पढाल यांचा मैत्री एक ऋणानुबंध वर्ग मित्रांतर्फे सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शनिवार ३० ऑगस्टला सायं ७ वाजता भद्रावती नगर पालिकेचे माजी नगरसेवक तथा शिवसेना तालुकाप्रमुख नंदू पढाल यांची विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लोकमान्य विद्यालयातील वर्ग मित्राच्या “मैत्री एक ऋणानुबंध ” या समूहातील मित्र-मैत्रिणी तर्फे सत्कार करण्यात आला.

तसेच समाजातील प्रत्येक घटकांना न्याय व सेवा देणाऱ्या त्यांच्या कार्याचे अभिनंदन करून त्यांना पुढील सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी पंकज पांढरे, मंगल कोचर, शैलेश कोठारी, पंकज भास्करवार, अनुप न्याहारे, गोपाल गायकवाड, छोटू नळे, मंगेश अंडरस्कर, नरेश भुसारी,नरेंद्र साने,भारती पांढरे, स्वाती गुंडावार, देवयानी रामटेके, ज्योती सोनुने व इतर मैत्रिणींनी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये