शेतीच्या कर्जबारीपणामुळे वृध्द शेतकऱ्याची आत्महत्या
शेगाव खुर्द येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
डोक्यावर शेतीच्या थकीत पिक कर्जाची रक्कम व कर्जफेडीची असमर्थता या विवंचनेत एका ६२ वर्ष वृध्द शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शेगाव खुर्द येथे दिनांक ३० ला सकाळी उघडकीस आली.
नामदेव कवडू गायकवाड, वय६२ वर्ष, राहणार शेगाव खुर्द असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आपले जिवन संपविले.सदर मृत शेतकऱ्याकडे शेगाव येथे ६.८० हेक्टर शेती आहे.त्यात त्यांनी यावर्षी सोयाबीन व कपाशीच्या पिकाची लागवड केली आहे.मात्र त्यांच्या डोक्यावर शेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे एक लाखावर कर्ज असुन ते अनेक दिवसांपासून थकीत आहे.
या विवंचनेतुनच त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेगाव पोलीस तथा महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे.