६ मार्चला ब्रह्मपूरीत शिवजन्मोत्सव पालखी सोहळा
शिवजयंती उत्सव सामितिच्या आयोजनाचे १५ व्या वर्षात पदार्पण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :_ शिवजयंती उत्सव समिति ब्रह्मपुरी तर्फ़े गेल्या १४ वर्षापासून ब्रह्मपुरीत तिथिनुसार शिवजन्मोत्सव पालखी सोहळा परंपरागत पद्धतिने साजरा केला जातो.
यावर्षि शुक्रवार दि ६ मार्च ला संपन्न होत असलेला पालखी सोहळा १५ व्या वर्षात पदार्पण करित आहे. दरम्यान दि ५ मार्च ला भवानी माता मंदिरात आई भवानीचा गोंधळ आणि महाआरती उत्साहात संपन्न झाला. शुक्रवार दि ६ मार्च ला दु ३ वाजता भवानी माता मंदिर ते शेष नगर असा भव्य परंपरागत पालखी सोहळा ढोल ताशा, दिंडी, चेंडा पथक, अश्व, रथ आणी मावल्यांच्या पारंपारिक वेषात निघनार आहे. सायं ७ वाजता बारई समाज व्यापार संकुलामागिल पटांगनावर भारतीय शिक्षण संस्था, नवरगांव च्या १५० कलावंतांतर्फ़े शिवगाथा महानाट्य सादर होणार आहे.
दरम्यान ३ गटात घेण्यात आलेल्या शिवकाव्य पाठांतर स्पर्धेतील विजेत्यांचे पारितोषिक वितरण होणार आहे. यावर्षि शिवकथाकार विजयराव देशमुख उर्फ़ सद्गुरुदास महाराज यांच्या शककर्ते शिवराय ग्रंथाचे पारायण ७५ शिवभक्तानी केले आणि सद्गुरुदास महाराज यांना आदरांजलि वाहिली.



