ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वस्त धान्य दुकान संलग्नित 15 दुकाने जाहीरनामे कधी लागणार नागरिकांचा सवाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

       चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या टोकेवर असलेल्या कोरपणा तालुक्यात एकूण 97 स्वस्त धान्य दुकान असून या भागातील अनेक दुकान अनेक वर्षापासून संलग्नित चालविल्या जात आहे.

यामुळे कोरपणा तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडली असून गेल्या अनेक वर्षापासून कोठोळा बुद्रुक दुर्गाडी धोपटाळा भोयगाव बोरगाव (इरई ) भारोसा इरई (बोरगाव ) निमनी बारवर्डी पिपरडा वनसडी नांदगाव हिरापूर ही दुकाने संलग्नित गेल्या २वर्षा पासून चालविल्याजात असताना अन्न पुरवठा विभाग जाहीरनामा मुलाखत ग्राम सभा व नंतर प्राधिकार पत्र ही संपूर्ण प्रकिया ३ तिन वर्ष अन्न पुरवठा विभाग चालवित आहे या मध्ये वेळ कालावधी चा काही नियम नाही ही प्रक्रीया किचकट व चालढकल पद्दतीचा अवलंब जिल्हा पुरवठा विभागाकडून होत असल्याने कोरपना तालुक्यात १३ दुकानाचे जाहीरनामे काढण्यात यावे आवाळपूर / नांदा येथिल ग्राम सभा होऊन ठराव देखिल सादर होऊन प्राधिकार पत्र गेल्या ६ महिन्या पासून देण्यात आलेले नाही.

सेवा शर्ती व नागरीकाची सनद जिल्हा पुरवठा विभागास लागु नाही का स्वस्त धान्य दुकान व जाहीरनामे सह प्रधिकार पत्र वितरणाचा कालावधी निश्चीत करूण अन्न पुरवठा विभागाच्या लहरी कारभारावर जिल्हाधिकारी चाप बसविणार काय असा सवाल धान्य लाभार्थीनी उपस्थित केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये