विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करून उद्योग-व्यवसायाकडे वळावे” — प्राचार्य नारायण मेहेरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
स्थानिक सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात पदवी व बक्षीस वितरण समारंभ दि. ६ मार्च २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐ. चंद्रमौली होते. प्रमुख अतिथी म्हणून भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावलीचे सचिव राजाबाळ पा.संगीडवार तसेच य. च. म. मु. वि. विभागीय केंद्राचे माजी संचालक प्राचार्य नारायण मेहेरे उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून डॉ. दिवाकर उराडे आणि प्रा. प्रशांत वासाडे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रशांत वासाडे यांनी करून समारंभाच्या उद्देशाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.रामचंद्र वासेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रेरणा मोडक यांनी मानले.
समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली तसेच युवारंग सांस्कृतिक व क्रिडा महोत्सव व राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने घेतलेल्या स्पर्धामधील विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले तसेच महाविघालयातील प्रा.राहूल बोबाटे व ओंकार चन्नावार यांनी नेट परिक्षा परिक्षेत यश प्राप्त केल्याबदल गौरव करण्यात आला तसेच स्किल कोर्स शिबिरांचे प्रमाणप वितरीत करण्यात आल्या. गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी प्राचार्य नारायण मेहेरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. त्यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता विविध कौशल्ये आत्मसात करून उद्योग-व्यवसायाच्या संधी शोधल्या पाहिजेत. शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्यासाठी नसून ते माणूस घडवणारे असावे. शिक्षणातून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, जबाबदारी आणि समाजाभिमुखता विकसित केली पाहिजे.
पुढे ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मिळालेली पदवी ही केवळ कागदपत्र न राहता ती त्यांच्या उपजीविकेचे साधन बनावी. शिक्षणातून सक्षम, जबाबदार आणि समाजाभिमुख नागरिक तयार होणे हीच शिक्षणाची खरी फलश्रुती आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ किरण बोरकर,डॉ संगानंद बागडे डॉ संदीप देशमुख, डॉ रागीनी पाटील,तसेच सर्व प्राध्यापकवुंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.



