ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन मुस्कान-१४’ मध्ये २० बालकांच्या आयुष्यात परतली ‘मुस्कान’

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

घरातील लहान मूल हरवले की त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. अशा विरहाच्या वेदना सोसणाच्या कुटुंबांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे क्षण फुलवण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस दलाने राबविलेली ‘ऑपरेशन मुस्कान-१४ ह मोहीम आस्थत यशस्वी ठरली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत गेल्या महिनाभरात पोलिसांनी शोध घेत तब्बल १० बालकांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या किंवा बाल कल्याण समितीच्या स्वाधीन केले आहे.

महिन्याभराचा धडाका आणि नियोजन

पोलीस अधीक्षक वर्धा आणि अपर पोलिस अधीक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आली. जिल्हयातील हरविलेल्या बालकांचा शोध येणे आणि बेवारस बालकांचे सुरक्षित पुनर्वसन करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. यासाठी उपविभागांतर्गत ४ विशेष पथके व अनैतिक मानवी वाहतूक शाखा यांचे एक पथक असे एकूण पाच पथके तयार करण्यात आली होती, ज्यामध्ये ४ अधिकारी आणि ३८ पोलीस अंमलदारांनी दिवस-रात्र परिश्रम घेतले, पोलीस उपअधीक्षक (गृह) बांनी या मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून समन्वयाची जवाबदारी पार पाडली.

सांख्यिकी तपशीलः शोध लागलेली बालके

मोहिमेदरम्यान पोलिसांनी दोन स्तरांवर काम केले:

१. नोंदणीकृत बालके (On Record): ज्या बालकांच्या बेपत्ता असल्याची नोद पोलीस ठाण्यांमध्ये होती, अशा १० बालकांचा (२ मुले व ८ मुली) शोध लावण्यात आला, त्यापैकी १० बालकाना जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिका-यांशी समन्वय साधून त्यांच्या पालकांचा शोध घेऊन सदर बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

भिक्षेकरी बालकांचेही रेस्क्यू

केवळ हरचिलेली मुलेच नन्हे, तर समाजात उपड्‌यावर भिक मागणाऱ्या बालकांकडेही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले मोहिमेदरम्यान भिक मागताना आढळलेली १० मुले। ६ मुले व मुली) रेस्क्यू करण्यात आली. बालमजुरी आणि मानवी तस्करी रोखण्यासाठीही जिल्हयात विविध ठिकाणी छापे टाकून कडक नजर ठेवण्यात आली होती.

या मोहिमेच्या यशात जिल्हा चाईल्ड लाईन (१०९८) जिल्हा बालसंक्षण कक्ष आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे (NGOs) मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये