ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन देवळी येथे शांतता समितीची बैठक

गणपती उत्सव व येणारे ईद-ए-मिलाद संबंधाने आयोजकासोबत मीटिंग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन देवळी अंतर्गत सुरू असलेले गणपती उत्सव व येणारे ईद-ए-मिलाद संबंधाने पोलीस स्टेशन देवळी येथे शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, गणेशोत्सव मंडळ चे आयोजक व डीजे चालक-मालक यांची आज दिनांक 28/8/2025 रोजी सायंकाळी 17/20 वाजता माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वंदना कारखेले मॅडम यांचे अध्यक्षतेत व पोलीस निरीक्षक अमोल मंडाळकर साहेब यांचे उपस्थितीत गणेशोत्सव मंडळाचे आयोजक व शांतता समिती सदस्य तसेच पोलीस पाटील व डी. जे. चालक-मालक यांना वरिष्ठाकडून प्राप्त परिपत्रकाप्रमाणे डेसिबल ठेवावे व लेझर लाईट डीजे वर लावू नये व शासनाने ठरवून दिलेल्या डेसिबलच्या वर आवाज जाऊ देऊ नये याबाबत मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या सदर मीटिंग करिता पोलीस स्टेशन परिसरातील एकूण 65 शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील,गणपती उत्सवाचे आयोजक तसेच डीजे चालक-मालक उपस्थित झाले होते सदर मीटिंग 18.30 वाजता समाप्त झाली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये