आ. जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रवी गुरनुले, मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, नगर सेविका शितल गुरुनुले, महिला महामंत्री सायली येरणे, विनोद शेरखी, पुरुशोत्तम राउत, राजु अवघडे, स्वप्निल लडके, निलिमा वनकर, अविता लडके यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी प्रशासनाची आठवण करून दिली. स्वराज्य स्थापनेच्या महान कार्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला स्वाभिमान, धैर्य आणि न्यायप्रिय शासनव्यवस्थेचा आदर्श दिला, असे यावेळी वक्त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.



