ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवजयंती निमीत्त शहरातील स्वराज्याची शपथ तथा बुध्दमुर्ती देखाव्यांची शिवसैनिकांव्दारे स्वच्छता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   भद्रावती शहरातील भद्रनाग मंदीर चौकातील बुध्द लेणी प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजुला नगरपरीषदेतर्फे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची शपथ सोहळा तथा बुध्दकालीन देखावे उभारण्यात आले आहे.

शिवजयंती निमीत्त येथील जेष्ठ शिवसैनीक तथा माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे यांच्या नेतृत्वात या देखाव्यांची पाण्याने स्वच्छता करुन हा परीसर शिवसैनीकांव्दारे स्वच्छ करण्यात आला.शहरात आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.त्यानिमीत्य शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.सकाळी शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे यांच्या नेतृत्वात शहरातील शिवसैनीक भद्रनाग मंदीर चौकात एकत्र आले.

त्यांनी पाण्याच्या सहाय्याने स्वराज्याची शपथ व बुध्द कालीन देखाव्यातील मुर्तींची स्वच्छता करुन सर्व परीसर स्वच्छ केला. या कार्यात माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, दिलीप पारखी यांचेसह अनेक शिवसैनीक सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये