एस.एन.डी.टी. विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात
मेजर ध्यानचंद जयंती निमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

चांदा ब्लास्ट
एन एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई च्या बल्लारपूर आवारात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धामध्ये बुद्धिबळ, कॅरम व लगोरी या खेळांचा समावेश होता. सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
हॉकी चे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबईचे बल्लारपूर येथील आवार महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल,बल्लारपूर येथे संचालक डॉ.राजेश इंगोले यांच्या निर्देशानुसार सहायक कुलसचिव डॉ.बाळू राठोड व समन्वयक डॉ .वेदानंद अलमस्त यांच्या मार्गदर्शनात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
बुद्धिबळ स्पर्धेत दुसऱ्या फेरीत कु. रितिका मुरमाडे व पहिल्या फेरीत कु.वैभवी आमटे विजयी ठरल्या तर कॅरम स्पर्धेत अस्मिता चौहान व स्नेहा यांच्या संघ ‘ब’ ने उत्तम प्रदर्शन केले तसेच लगोरी स्पर्धेत गुंजा,निधी,सृष्टी,गौरी,सभा,विधी,नव्या व मिसभा खान यांचा संघ विजयी ठरला.
या स्पर्धांच्या यशस्वितेसाठी सहा प्राध्यापिका निहारिका सातपुते, स्नेहा लोहे सह संपूर्ण प्राध्यापक वृंदांनी सहकार्य केले.