ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चेकबरंज तंटा मुक्ती अध्यक्षपदी रवींद्र डोंगे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील चेकबरांज ग्रामपंचायत येथील तंटामुक्त अध्यक्षपदाची दिनांक २९ रोजी शुक्रवारला ग्रामसभा पार पडली त्या सभेत रवींद्र डोंगे यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली
सदर निवड प्रक्रिया ग्रामपंचायत उपसरपंच तथा बांधकाम सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती राजू डोंगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या ग्रामसभेला एकमताने रवींद्र डोंगे यांची निवड करण्यात आली या ग्रामसभेला उपसरपंच राजू डोंगे, ग्रामसेवक वर्षा ढाले, पोलीस पाटील रीता रामटेके, आशा वर्कर निशा मेश्राम,बचत गट अध्यक्ष सुरेखा कुंमरे,माधुरी आत्राम,कल्पना कुळसंगे,प्रभाकर कुळमेथे, लालचंद वर्मा, शुभम डोंगे आदी उपस्थित होते.