निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात एड्स रक्तशय जनजागृती व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक भद्रावती येथील निळकंठराव शिंदे महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट रोजी एड्स व रक्तक्षय जनजागृती तसेच रक्त तपासणी शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. एल एस लडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. अपर्णा धोटे तर मार्गदर्शक म्हणून आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय भद्रावतीचे डॉक्टर शितल भडके व डॉक्टर सुरपाम उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉक्टर शितल भडके यांनी एचआयव्ही एड्स विषयी त्याचा प्रसार कसा होतो त्याबरोबरच हा आजार होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यावी व या आजारामुळे रुग्णाच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात व त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होते असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर डॉक्टर सुरपाम यांनी रक्ताक्षय म्हणजेच ऍनिमिया याविषयी मार्गदर्शन करताना एनिमिया मुळे आपल्या शरीरात हिमोग्लोबिनची कमी होते व ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत असल्यामुळे थकवा कमजोरी आणि चक्कर येण्यासारखे लक्षणे दिसतात असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा धोटे यांनी आरोग्य विषयी जागरूकता व तपासणी का आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा कुलदीप भोंगळे तर आभार प्रदर्शन प्रा सचिन श्रीरामे यांनी केले
या कार्यक्रमानंतर लगेच हिमोग्लोबिन, शुगर,ॲनिमिया, सिकलसेल व सी बी सी या सर्व रक्त तपासण्या करण्यात आल्यात. महाविद्यालयातील एकूण ८० विद्यार्थ्यांच्या रक्ताची तपासणी यामध्ये करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी तसेच ग्रामीण रुग्णालय भद्रावतीचे कर्मचारी यांनी सहकार्य केले