ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धार्मिक कार्याच्या प्रवासासाठी आई,वडिलासह गुरुचेही योगदान महत्वाचे – संत मुर्लिधर महाराज

देवटोक येथे यात्रा उत्सवाची सांगता ; जिल्ह्यासह विदर्भातील भक्त,भाविकांची उपस्थिति

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

मकर संक्रांतिच्या पावन पर्वावर तालुक्यातील देवटोक (सीर्सि) येथे प्रथम पुण्यभूमी तीर्थक्षेत्र श्री मुर्कण्डेश्वर ऋषी देवस्थान येथे संत.श्री. मुर्लिधर महाराज यांच्या पुढाकारातून भव्य धार्मिक व सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातून हजारो भक्त-भाविकांनी उपस्थिती लावत दर्शन-लाभ घेतला.

उत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक विधी, कीर्तन, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यात्रा उत्सव समापन समारंभा प्रसंगी बोलताना प.पु.संत.श्री. मुर्लिधर महाराज म्हणाले, “चपराळा येथील ब्रह्मकालीन कार्तिक स्वामी महाराज यांच्या गुरुचरणी माझे संपूर्ण आयुष्य समर्पित करून मी धार्मिक कार्यास प्रारंभ केला आहे. आई-वडिलांचे संस्कार आणि गुरुकृपा यामुळेच हा धार्मिक प्रवास शक्य झाला. देवटोक देवस्थानाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देणे, हाच माझा संकल्प असून जनहितासाठी हे कार्य अखंड सुरू राहील.”

उत्सवाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून सामाजिक जबाबदारी पार पाडली. तसेच सांस्कृतिक स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या प्रथम पुण्यभूमी तीर्थक्षेत्र श्री मुर्कण्डेश्वर ऋषी देवस्थानाला पुन्हा धार्मिक व जत्रेचे पारंपरिक स्वरूप प्राप्त व्हावे, या उदात्त हेतूने प.पु.संत.श्री. मुर्लिधर महाराज यांच्या नेतृत्वाखाली मकर संक्रांति निमित्त या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा उत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत भक्तिभावाच्या वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी श्री मुर्कण्डेश्वर ऋषी देवस्थान ट्रस्ट, देवटोक (सीर्सि) येथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल प.पु.संत.श्री.मुर्लिधर महाराज यांनी समाधान व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये