मोटर सायकल चोरीचा गुन्हा उघड
पो.स्टे. वर्धा शहर गुन्हे पथकाची कामगीरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नमुद घटना ता. वेळी व स्थळी यातील फिर्यादी नामे युगंधर मनोज कार्लेकर वय 30 वर्ष रा. महादेव पुरा वर्धा यांनी त्यांचे मालकीची ड्रीम युगा होंडा कंपनीची काळया रंगाची मोटार सायकल क्रमांक एम.एच.27 सी.पी.3140 ही दिनांक 24/12/2026 चे सायंकाळी 07/00 वाजताचे दरम्यान घरा समोर बाहेर लॉक करून उभी करून ठेवली होती. दिनांक 25/01/2026 रोजी सकाळी 06/00 वाजता चे दरम्यान फिर्यादी यांनी बाहेर येवुन पाहिले असता त्यांना त्यांची ड्रीम युगा होंडा कंपनीची काळया रंगाची मोटार सायकल क्रमांक एम. एच.27 सी.पी. 3140 किंमत अंदाजे 30,000/-रू. ची हि दिसुन आली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो स्टे. वर्धा शहर येथे अप.क्र. 1870/26 कलम 303 (2) भा.न्या.सं. अन्वये गन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हा तपासावर असतांना मुखबीर कडुन खात्रीशिर मिळालेल्या माहिती वरून दिनांक 18/01/2026 रोजी अज्ञात आरोपी नामे आदित्य अनिल ठाकरे वय 20 वर्ष रा. केजाजी चौक, गोंडप्लॉट, वर्धा ता.जि. वर्धा यास पंचासमक्ष ताब्यात घेवुन सदर गुन्हयाचे तपास संबंधाने विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हयातील मोटार सायकल चोरल्या बाबत कबुली दिल्याने दोन पंचासमक्ष त्याचे ताब्यातुन एक जुनी वापरती ड्रीम युगा होंडा कंपनीची काळया रंगाची मोटार सायकल क्रमांक एम. एच.27 सी.पी.3140 किंमत 30,000/-रू जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. सौरभ अग्रवाल साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. सदाशिव वाधमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर साहेब, तसेच ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर मा. श्री. संतोष ताले साहेब यांचे निर्देशनुसार पोलीस ठाणे वर्धा शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शरद गायकवाड साहेब पोलीस हवालदार महेंद्र पाटील ब.क.523, पोलीस हवालदार अभिजित वाघमारे ब.क्र.1416, पोलीस अंमलदार रंजित भुरसे ब.क्र. 1717, पोलीस अंमलदार अमोल साळवन ब.क.970, पोलीस अंमलदार अमोल ढोभळे ब.क्र. 1738 यांनी केला आहे.



