लखमापूर येथे रासेयो विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना व पर्यावरण सेवा योजनाच्या विद्यार्थ्यांनी लखमापूर या गावांमध्ये वृक्षदिंडी काढून तेथील स्मशानभूमी येथे वृक्षरोपण केले.
या वृक्षरोपण कार्यक्रमाला महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे, उपमुख्याध्यापक श्री विजय डाहुले,लखमापूर येथील सरपंच श्री अरुण जुमनाके ग्रामपंचायत सदस्य श्री प्रमोद सिडाम, श्री मोरेश्वर जोगी, श्री शंकर उरकुंडे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी श्री प्रदिप परसुटकर, रा से. यो. अधिकारी प्रा सचिन भैसारे, प्रा. प्रशांत पवार, प्रा. संगीता पुरी, प्रा. सुधीर थिपे, प्रा. नरेंद्र हेपट तसेच गावातील युवक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.