सरदार पटेल महाविद्यालयामध्ये आर्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन वर प्रेरणादायी व्याख्यान

चांदा ब्लास्ट
दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सरदार पटेल महाविद्यालयात ‘आर्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन’ या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.अरविंदजी पोरेड्डीवार होते. प्रमुख वक्ते म्हणून स्वामी अनुकूलानंद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, सी. जे. खैरवार, स्वामी प्रत्ययानंद, स्वामिनी हरिप्रियानंदा आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंदजी पोरेड्डीवार यांनी सन्मान चिन्ह देऊन स्वामी अनुकूलानंद यांचे स्वागत केले. प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत कार्यक्रमाच्या उद्देशावर प्रकाश टाकला.
प्रमुख वक्ते स्वामी अनुकूलानंद यांनी एकाग्रता ही मन व शरीरासाठी किती आवश्यक आहे, तसेच अभ्यास, व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनातील सकारात्मक बदलासाठी ती कशी उपयुक्त ठरते, याविषयी विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शीतल कटकमवार यांनी केले, तर प्रा. किशोर भावरकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अरविंद ना. पोरेड्डीवार, कार्यकारी अध्यक्ष मा. किशोरभाऊ जोरगेवार, उपाध्यक्ष मा. सुदर्शन निमकर, सौ. सगुनाताई तलांडी, सचिव मा. प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष मा. संदीप गड्डमवार तसेच सदस्य मा. राकेश पटेल, मा. जीनेश पटेल, मा. सुरेश पोटदुखे, मा. एस. रमजान यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.



