ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भाजपच्या भ्रष्ट, अपयशी कारभाराला जनता कंटाळली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
बोगस पट्टे प्रकरणावरून भाजपचे पितळ उघडे,विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने आज शहरातील विविध प्रभागातून रोड शो करीत जोरदार शक्तिप्रदर्शन करून भाजपविरोधात रणशिंग फुंकले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर सडकून टीका करत म्हटले की, देशासह संपूर्ण राज्यात व महानगरपालिकेत भाजपने विकासाच्या नावाखाली फक्त लुटीचे राजकारण केले. रस्ते नाहीत, पाणी नाही, स्वच्छता नाही मात्र भ्रष्टाचार मात्र सर्वत्र आहे. भाजपने चंद्रपूरला विकास नव्हे तर दुर्दैव दिले आहे.म्हणून आपण या भाजपला धडा शिकवून काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
आयोजित सभेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, आ . सुधाकर अडबाले, माजी आमदार सुभाष धोटे,माजी मंत्री वसंत पुरके, विनायक बांगडे, प्रवीण पडवेकर, संतोषसिंह रावत, शिवा राव,प्रमोद बोरीकर, अनिल शिंदे, कुंदा जेणेकर, शंतनु धोटे, खेमराजव तिडके, राजू रेड्डी कुणाल चहारे स्थानिक काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांचेसह लावणी कलावंत गौतमी पाटील व चंद्रपूर महानगर पालिका निवडणूकितील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व प्रभागाचे उमेदवार मंचावर उपस्थित होते.
यावेळी सभेला संबोधित करतांना विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत भाजपचा समाचार घेतला. देश व राज्याला कर्जबाजारी करून भाजपने प्रचंड भ्रष्टाचार केला.यामुळे महागाई व बेरोजगारी वाढली. गरिबांचे जगणे अवघड झाले आहे. हे सत्तेतील भाजपचे पदाधिकारी आता शासन नियमावलींना पायदळी तुडवत असून याचा प्रत्यय भाजपचा माजी शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार याने शहरातील गोरगरीब जनतेच्या भावनेशी खेळ करून बोगस पट्टे वाटप केल्याच्या प्रकारातून पुढे आला. मागील दहा-दहा वर्षे सत्तेत असूनही नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर भाजप पूर्णपणे अपयशी ठरला आहे. अमृत योजना, हर घर नल योजना, स्वच्छ भारत – सगळ्या केवळ जाहिरातीपुरत्या राहिल्या. नळात पाणी नाही, रस्त्यांवर खड्डे आहेत आणि कर मात्र वाढवले जात आहेत. हा अन्याय आता चंद्रपूरची जनता खपवून घेणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.
तर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपच्या महिला-विरोधी धोरण, महिला अत्याचार, व देशात लोकशाहीची होणारी गळचेपी या मुद्द्यांवरून भाजपाला घेरले. माजी मंत्री वसंत पुरके यांनी भाजपच्या फसव्या आश्वासनांचा पर्दाफाश करत निवडणूक आली की मोठमोठी स्वप्ने दाखवायची आणि सत्ता मिळाल्यावर जनतेकडे पाठ फिरवायची—हा भाजपचा जुना खेळ आहे. चंद्रपूरला आता लुटारू नव्हे, तर जनतेचे सेवक हवेत.
सभेच्या शेवटी काँग्रेस नेत्यांनी भाजपला सत्तेतून हद्दपार करण्याचे आवाहन करत, चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला. आयोजित सभेस हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



