ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपुरात काँग्रेसची अंतर्गत स्वच्छता

माजी जिल्हाध्यक्षांसह ७ नेत्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्ष शिस्तीचा भंग करणाऱ्या आणि अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्या चंद्रपूर शहरातील ७ पदाधिकाऱ्यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून ही कडक कारवाई करण्यात आली असून, याबाबतचे अधिकृत आदेश १२ जानेवारी २०२६ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

या कारवाईमध्ये चंद्रपूर शहर काँग्रेसमधील महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असून, प्रामुख्याने माजी जिल्हाध्यक्ष नंदू संभाजी नागरकर यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच माजी नगरसेवक प्रशांत आनंदराव दानव, माजी नगरसेवक सकीना अन्सारी, माजी नगरसेवक विना अभय खनके, स्वप्नील चिवंडे, रवि भिसे आणि छबुताई विजय पोहणकर या सात जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करणे, पक्षाच्या विरोधात प्रचार करणे आणि पक्ष शिस्तीचे उल्लंघन करणे यासारख्या गंभीर बाबी या पदाधिकाऱ्यांकडून घडल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर, संघटनेची शिस्त अबाधित राखण्यासाठी ही कठोर पावले उचलण्यात आल्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये