मुख्य निवडणूक निरीक्षकांनी केली निवडणूक व्यवस्थेची पाहणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- मा. राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले मा. मुख्य निवडणूक निरीक्षक विजय भाकरे (भा.प्र.से) यांनी चंद्रपूर महानगरपालिका मतदासंघाला भेट देऊन निवडणूक व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी १२ जानेवारी रोजी सुरक्षा कक्षाची पाहणी केली तसेच साहित्य वाटप, साहित्य परत घेणे आणि मतगणना कक्ष तयारीबाबत आढावा घेतला.
महानगरपालिका क्षेत्रातील निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित आणि नियमानुसार पार पाडण्यासाठीच्या उपाययोजनांची पाहणी करतांना सर्व चेक पोस्टवर गांभिर्याने तपासणी करावी तसेच दारू, रक्कम, ड्रग्ज,अवैध मार्गाने येणा-या वस्तुंची जप्ती करावी. मनपाने जाहीर केलेल्या टोल फ्री नंबर व व्हॉट्स अँप नंबर येणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन निकाली काढण्याचे निर्देश दिले.
त्यांनी स्वतः सुद्धा काही चेक पोस्टला भेट देऊन निरीक्षण केले,वाहनांची तपासणी केली व विना परवानगी असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. आचारसंहितेचे काटेकोर पालन आणि सुरक्षा व्यवस्था यात कुठलीही कसर राहणार नाही असा सूचक इशारा त्यांनी या भेटीतून दिला.



