सरदार पटेल महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचालनासाठी निवड

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेविका कु. टिंक्कल उईके व स्वयंसेवक सूरज पेंदोर यांची दि. २६ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचालनासाठी निवड झाली आहे.
ही निवड महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद असून, या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिस्त, समर्पण व राष्ट्रीय सेवेची भावना या बाबी महत्वपूर्ण ठरल्याचे मत व्यक्त करीत त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. वंदना खनके प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जिनेश पटेल तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि रासेयोचे स्वयंसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत



