सरदार पटेल महाविद्यालयात मतदान जनजागृती अभियान व रॅली

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ येथील सरदार पटेल महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात मतदान जनजागृती रॅली चंद्रपूर शहरातून काढण्यात आली.
या अभियानात एनसीसी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. सतीश कन्नाके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. निखिल देशमुख, डॉ. वंदना खणके, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, राज्यशास्त्र विभागाचे डॉ. निलेश चिमुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात कॅप्टन डॉ. सतीश कन्नाके यांनी मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील नागरिकांची भूमिका याविषयी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले तसेच सर्व स्वयंसेवकांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली.
यानंतर मतदान जनजागृती रॅली चंद्रपूर शहरातून काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देत मतदानासाठी सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या अभियानात राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबाबत शुभेच्छा दिल्या.



