8 तारखेला ब्रम्हपुरीत जनसुरक्षा विधेयक विरोधात विशाल मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करणारे आणि जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू पाहणारे जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्राच्या विधिमंडळात बहुमताने पारित केला.आमच्या बहुसंख्येने असलेल्या दलीत आदिवासी, बहुजनांवर होणारे अन्याय अत्याचार,हक्क अधिकारासाठी लढा देण्यासाठी आता रस्त्यावर उतरून आंदोलने करता येणार नाही.भारतीय संविधाने दिलेले मूलभूत अधिकार आमच्यापासून हिरावून घेणारे हे विधेयक आहे.
एक प्रकारे बहुजनांचा आवाज दाबल्या जाणार आहे. जनसुरक्षा विधेयक हुकूमशाहीची नांदी आहे.या जनसुरक्षा विधायकाला विरोध करण्यासाठी. जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती, ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने दिनांक 8 ऑगस्ट 2025 ला *महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करा. शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी लागू करा व भेदभाव न करता थकित बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करा.
ओबीसी, एस. सी. एस टी. एन.टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा व विद्यार्थ्यांना दर महिन्याला त्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्यात यावे. हया मागण्या सह
तहसील कार्यालयावर विशाल मोर्चा चे आयोजन करण्यात आले असून मोर्चा सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मारक ब्रम्हपुरी येथून निघणार असून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकले . या मोर्चास काँग्रेसी पक्षांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला असून आयोजित मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.