मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, आदर्श चिखली बु शाळाला पुरस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक -2 या स्पर्धेत जिवती पंचायत समितीमधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा चिखली बु शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था च्या शाळा या वर्गवारीत जिवती तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे. दोन लाख रुपयाचा पुरस्कार शाळेला प्राप्त झाला आहे.
गडचांदुर पाटण मार्गे डोंगर चढल्यावर बरोबर रस्त्याच्या लगत असलेलं छोटसं टुमदार असं चिखली गाव! जेमतेम तीनशे ते चारशे लोकवस्ती असलेलं संपूर्ण आदिवासी, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम गावात वर्ग एक ते आठ असून रेंगेगुडा, तुमरी गुडा कोलाम गुडा नाईक नगर या गावातील मुले शिक्षणासाठी येतात. शिष्यवृत्ती सराव वर्गामुळे शिष्यवृत्ती आणि एन एम एम एस या परीक्षेत विद्यार्थी पात्र होतात. विशेष म्हणजे या शाळेतील दोन विद्यार्थी इस्रो व हैदराबाद येथे अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेली होती. व ते विद्यार्थी अभ्यास दौरा करून परत आली. तसेच नवरत्न, बाल क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी तालुकास्तर जिल्हा स्तरापर्यंत मजल मारून चिखली शाळेचे नाव लौकिक केलेले आहे. विद्यार्थी शाळेत आला पाहिजे, टिकला पाहिजे व शिकला पाहिजे याप्रमाणे शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न शिक्षकाकडून केला जात आहे. शासनाच्या विविध उपक्रमात या शाळेचा सहभाग घेत असून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी आदर्श शाळा म्हणून या शाळेचा तालुक्यात नावलौकिक आहे. शाळेच्या भौतिक गरजांसाठी शाळा सुधार फंड, ग्रामपंचायत, महावितरण विद्युत महामंडळ यांच्या शी एस आर फंडातुन टेबल खुर्ची कपाट पंखे प्रिंटर्स आरो स्मार्ट टीव्ही व्हिडिओ कॉन्फरन्स टीव्ही अशा 75 टक्के भौतिक सुविधा पूर्ण केले आहे.
यासाठी मुख्याध्यापक राजकुमार एन. मून यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांनी मोठी मेहनत घेतली आहे
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौमंजुषा करपते, उपाध्यक्ष कसनदास चव्हाण, सदस्य सुरेश मेश्राम दिवाकर मेश्राम सौ ज्योत्स्ना घायवनकर सौ रंजना सुरपाम, तसेच इतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सरपंच गेडाम ताई, उपसरपंच करपते साहेब आणि इतर ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.
जिवती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. धनराज आवारी साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याची येथील शिक्षकांनी सांगितले. गटशिक्षणाधिकारी मा. अमर साठे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा. रामगिरीकर सर, शिक्षण विस्तार अधिकारी मा. चौधरी साहेब, केंद्रप्रमुख मा. सौ साधना धांडे मॅडम आदी मार्गदर्शन करत आहे. मुख्याध्यापक राजकुमार एन. मुन आणि शाळेतील शिक्षक उद्धव पवार सर, वामन चव्हाण, बोबडे मॅडम, भजने मॅडम, भगत मॅडम, वाकुडकर सर यांचे विशेष सहकार्य लाभले. यासोबतच पाटण केंद्रातील शिक्षकांचे सहकार्य लाभले.
अशी आहे शाळा
आकर्षक रंगरंगोटी, बाला पेंटिंग बोलक्या भिंती प्रेरणादायी वाचन परसबाग हॅन्ड वॉश स्टेशन वृक्ष संवर्धन विद्यार्थ्यासाठी लिहिलेले संदेश फुलबाग परिसर सुंदर व स्वच्छ फ्लेवर ब्लॅक लावलेले आकर्षक मैदान
शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना आनंदी वाटावे त्यांना अभ्यासात मन रमावे यासाठी परिसर स्वच्छ व सुंदर असणे आवश्यक आहे यासाठी गावातील नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य आणि शाळेच्या शिक्षकांच्या मदतीने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे.
राजकुमार मून, मुख्याध्यापक चिखली बु