श्री.आशिष देवतळे यांची तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हा चंद्रपूरची महत्वपूर्ण आढाव बैठक जोड देऊळ मंदिर पठाणपुरा चंद्रपूर येथे पार पडली. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष माजी खासदार मान.श्री.रामदासजी तडस साहेब, प्रदेश महासचिव मान.श्री.भूषणजी कर्डिले साहेब, प्रदेश कोषाध्यक्ष मान.श्री.गजाननजी शेलार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री.आशिष देवतळे यांना युवा आघाडी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.
याप्रसंगी युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मान.अतुलजी वांदिले, उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष मान.पोपटराव गवळी, प्रदेश उपाध्यक्ष मान.प्रकाशजी देवतळे, विभागीय अध्यक्ष मान.जगदीशजी वैद्य, जिल्हाध्यक्ष श्री.अजयजी वैरागडे, विभागीय कार्याध्यक्ष महिला आघाडी सौ.छबुताई वैरागडे, जिल्हाध्यक्ष युवा आघाडी श्री.आशिषजी देवतळे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सौ.श्रुतीताई घटे, शहराध्यक्ष चंद्रपूर श्री.राहुलजी क्षीरसागर, शहराध्यक्ष महिला आघाडी चंद्रपूर सौ.कल्पनाताई बगुलकर ज्येष्ठ समाजसेवक श्री.बबनरावजी फंड, श्री.विनायकजी बांगडे, बावणे यांची उपस्थिती होती.
सोबतच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हा कार्यकारणीत तसेच तालुका व शहर कार्यकारणीत कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी जिल्ह्यातून मोठ्या संख्येत तेली समाज बंधू-भगिनीं उपस्थित होत्या