ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती शहराला स्वतंत्र बस स्थानक मिळन्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन सादर

युवासेनेचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       भद्रावती येथे सध्या लीजवर घेतलेल्या जागेवर बस स्थानक चालवले जात असून, नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भद्रावती शहराला स्वतःचे हक्काचे व अद्ययावत बस स्थानक मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले.

हे निवेदन युवासेना विदर्भ सचिव शुभम नवले व कार्यकारणी सदस्य हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनात व युवासेना जिल्हाप्रमुख आलेख भाऊ रट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि युवा शिवसैनिक सुमित हस्तक यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

भद्रावती हा औद्योगिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा तालुका असून, येथे हजारो नागरिक दररोज प्रवास करतात. मात्र, अद्यापही हक्काचे बस स्थानक नसल्याने प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

युवासेनेच्या वतीने मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनात, भद्रावती शहरात स्वतंत्र, शासकीय जागेवर आधुनिक सुविधा असलेले एस.टी. बस स्थानक तातडीने मंजूर करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

या जनहिताच्या प्रश्नावर लवकरच सकारात्मक कार्यवाही होईल, असा विश्वास युवासेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शिवसैनिक सुरज भाऊ शाहा, युवा शिवसैनिक राज चव्हाण, शिवसैनिक संदीप चटपकर, युवा शिवसैनिक पीयुष सिंग, युवा शिवसैनिक रवी ढवस व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये