ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इंटक अध्यक्ष धनंजय गुंडावार यांच्यासह दिडसे कामगारांचा आयटक मध्ये प्रवेश

भद्रावती येथे आयटकचा कार्यकर्ता मेळावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           भद्रावती येथील प्रियदर्शनी खासगी आयटीआय येथे माजरी वेकोली क्षेत्रातील आयटक कामगार संघटनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.या मेळाव्यात माजरी वेकोली क्षेत्राचे इंटक अध्यक्ष धनंजय गुंडावार यांच्या नेतृत्वात दिडशे वेकोली कामगारांनी आयटक कामगार संघटनेत प्रवेश केला.

मेळाव्यात धनंजय गुंडावार यांची माजरी वेकोली क्षेत्राच्या आयटक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सदर मेळाव्याला वेकोली आयटक युनियनचे अध्यक्ष मस्के,महासचीव सी.जे.जोसेफ,कोषाध्यक्ष दिलीप बर्गी तथा अन्य मान्यवर ऊपस्थीत होते. मेळाव्याला मार्गदर्शन करतांना महासचीव जोसेफ यांनी आयटक हे कामगारांच्या न्याय हक्कासाठी काम करणारे स्वातंत्र्यपुर्व काळापासून अस्तित्वात असलेले संघटन असुन कामगारांच्या ऊत्थानात संघटनेची भरीव किमगिरी असल्याचे सांगीतले.

यावेळी अन्य मान्यवरांनी सुध्दा आपापले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन संजय दुबे यांनी तर आभार मोहम्मद असलम अंसारी यांनी मानले.मेळाव्या माजरी वेकोली क्षेत्रातील आयटक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये