ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलेला लढा अविस्मरणीय : पाशा पटेल

ॲड. टेमुर्डे यांच्या 83 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अतुलनीय कार्य करीत अनेक मानसांचा गोतावळा निर्माण करीत विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्र जोडले. त्याच्या व्यक्तीमत्वातील स्पष्टवक्तेपणा व साधेपणा या गुणांमुळेच त्यांचा सहवास सर्वसामान्य जनतेला हवाहवासा वाटत होता. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्याने त्यांना शेतकरी, शेतमजूर बांधवांचे सुख दुःख कळत होते. त्यामुळे शेतकरी शेतमजूरांच्या हितासाठी त्यांनी दिलेला लढा अविस्मरणीय होता असे विचार महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले. ते स्थानिक श्री मंगल कार्यालयात आयोजित ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या ८३ व्या जयंती निमित्य आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानातून मार्गदर्शन करतांना बोलत होते.

याप्रसंगी व्यासपिठावर स्वागताध्यक्ष विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेन्ट) वरोराचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, ॲड. टेमुर्डे यांच्या अर्धांगिनी मायाताई टेमुर्डे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, रुलर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रमेश राजुरकर, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे, गुरूकुंज आश्रम मोझरी चे सर्वाधिकारी लक्ष्मण गमे, विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोराचे उपाध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक जयंत टेमुर्डे, विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट। वरोराचे सचिव अमन टेमुर्डे, सहसचिव राजेंद्र गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी श्री.टेमुर्डे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत गतकालीन स्मृतींना उजाळा दिला. यानिमित्ताने मायाताई टेमुर्डे यांचा साडीचोळी व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यानिमित्याने ॲड. टेमुर्डे यांच्या सरसेनापती नामक जीवनचरित्राचे प्रकाशन, विवेक वार्षिकांक प्रकाशन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, वृक्षारोपण, डिजिटल क्लासरूमचे रक्तदान व शालीनीताई मेघे हाॅस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर, नागपूर यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी टेमुर्डे यांचे हितचिंतक, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अमन टेमुर्डे, संचालन डॉ ज्योती राखुंडे, आभारप्रदर्शन डॉ सुधीर आस्टुनकर यांनी केले. विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे संचालक मंडळ, कार्यक्रम आयोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये