चिखली बु येथील परस बाग जीवनदायी बाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बाग म्हटलं की देतो आनंद, बागेत गेले की शरीर, अगदी हलकं होत असतं. मनावरील ताण- तणाव विसरून एक वेगळ्या जगात मन फिरत असतो. परंतु परसबाग ही वेगळीच उर्जा आहे.
परसबाग ही केवळ शाळकरी विद्यार्थ्यांनी फुलवायची असते असे नव्हेच! अगदी कमी जागेत कमी पाण्यावर पौष्टिकता मिळवता यावी व शरीर धडधाकट आणि निरोगी ठेवायचे याकरिता केलेले प्रयत्न म्हणजे परसबाग असावी. खरे तर शालेय विद्यार्थ्यांना मिळणारे मध्यान भोजन हे अत्यंत पौष्टिक असावे. गरिबीतील जीवन जगणारे मुले दुपारी घरी जाऊन भोजन मिळतेच असे नाही. प्रधानमंत्री शालेय पोषण आहार घेऊनच पोट भरणे एवढेच आहे. पण आता प्रधानमंत्री पोषण आहारामध्ये बरीच सुधारणा झालेली दिसते. बिस्किटे व इतर धान्य अंडी केळी मिळाल्यामुळे विद्यार्थी सुदृढ होण्यास मदत होते.
परस बाग निर्मिती करून त्यातील मिळणारा भाजीपाला हा अत्यंत जीवन युक्त मिळत असते. कारण कुठलेही रासायनिक पदार्थ नसल्याने परसबागेत मिळणाऱ्या भाज्यांना सर्व जीवांचे मिळत असते. हा अनुभव मला आलेला आहे. मध्यान भोजन शाळेतच मिळणाऱ्या आहारात बरेच बागेतील भाजीपाला व परत बागेतील उपलब्ध पालेभाज्या शरीरातील जीवनसत्व भरून काढतात
परसबाग हे केवळ शाळेतच नाही. तर प्रत्येक कुटुंबातील आपापल्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने तयार करावी येणारी भावी पिढीच्या शरीरामध्ये जीवनसत्वाचे कर्ज राहणार नाही. परत बाघी शोभेची वस्तू नसून शरीराला सुदृढ ठेवणारी असावी बाजारात मिळणारा पालेभाज्या म्हणजे वेगवेगळी रासायनिक खते व कीटकनाशके यांची फवारणी करीत असल्याने आपले मानवीय मानवीय शरीरावर अनेक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. बीपी शुगर कॅन्सर हृदयविकार आंधळेपणा यासारखे जीवकेने आजार दिवशी ने दिवस वाढत आहे.
जि प उच्च प्राथमिक आदर्श शाळा चिखली बुद्रुक येथे सतत पाच वर्षापासून विद्यार्थी शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक गावकरी यांच्या मदतीने परसबाग निर्मिती करून प्रधानमंत्री शालेय पोषण आहारामध्ये भाजीपाला समाविष्ट करीत आहो. यामुळे विद्यार्थ्यांना जीवनसत्वे प्रथिने मॅग्नीज व संतुलित आहार मिळतो मुळे विद्यार्थी सुदृढ राहण्यास मदत होते याचे श्रेय म्हणून सन 2022- 23 व 2024-25 मध्ये परसबाग पुरस्कार प्राप्त झाला आहे
परत बागही अत्यंत कमी गुंतवणुकीमध्ये करता येत तसेच ताजा व जीवन युक्त भाजीपाला मिळण्यास मदत होते धकाधकीच्या जीवनावर आपल्या आरोग्याची काळजी घेत नसल्यास आपणास अनेक आजारांना सामोरे जावे लागते त्यामुळे विद्यार्थी दररोज परसबाग निर्मिती करून आपले निर्मिती करून आपले घरी व शाळेत मिळणारा भाजीपाला ताजा व जीवन युक्त मिळण्यास मदत होते आपला वेळ सुद्धा वाया न जाता अंतर मशागत करण्यात घालवल्यास आपल्या हाताने तयार झालेला भाजीपाला शेवटपर्यंत आनंद मिळेल
. आनंदी रहा, निरोगी रहा, प्रत्येकाने परसबाग निर्मिती करा! असे आवाहन
राजकुमार एन . मून विषय शिक्षक
जि प उच्च प्राथमिक शाळा चिखली बु यांनी केले आहे.