बोढेगावात कोब्रा नागाला जीवनदान.!
सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर गुड्डेवार यांचा पुढाकार...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- अरे..बापरे.. निव्वळ “नाग” हा शब्द उच्चारला तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. अण्! तब्बल! पाच सहा फुटाचा कोब्रा नाग हा भला मोठा साप पकडणे म्हणजे!कल्पनाच करवल्या जात नाही.! साप पकडण्याचे कोणते प्रशिक्षण नाही. सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर गुड्डेवार यांच्या पुढाकारात बोढेगाव येथील दोन-तीन युवकाने चक्क त्या कोब्रा नाग सापाला रिक्स घेऊन पकडले आणि जीवनदान दिले.
एवढेच नव्हे तर! हा अनुभव तेवढ्यात चित्त थरारक असला तरी वन विभागाचे वनरक्षक यांच्यासमोर एका सर्पमित्राच्या साह्याने त्याला निसर्ग मुक्त करण्यात आले. सदर प्रसंग ब्रह्मपुरी तालुक्यातील बोढेगाव येथील सूर्यकांत पंढरी नखाते यांच्या घरी अनुभवायला मिळाला. बोढेगाव येथील सूर्यकांत पंढरी नखाते यांचे घर गावाबाहेर त्यांच्यात शेतात बांधले आहे. सोबत त्यांचा कोंबडी पालनाचा व्यवसाय आहे. त्यांनी घरा समोरील मोकळ्या जागेत कोंबडी पालनासाठी सभोवताल कोंबड्यांच्या सुरक्षेतेसाठी जाळी लावली आहे. कोब्रा नागाने एका उंदराला भक्ष केल्यानंतर परत पुन्हा भक्ष्याच्या शोधात कोंबड्यांच्या मागावर आला. परंतू सभोवताल जाळी लावली असल्यामुळे तो जाळ्यात अडकला. सकाळीच घर मालक हा कोंबड्यांना खाद्य घालण्यासाठी अंगणात गेला असता. त्यांना कोब्रा नाग जाळ्यात अडकलेला दिसला. लगेचच त्यांनी गावकऱ्यांना माहिती कळवली. कोब्रा नाग जाळ्यात अडकून असल्याची माहिती गावभर पसरली त्यानंतर गावकऱ्यांची व परिसरातील नागरिकांची नागाला पाहण्यासाठी तोबा गर्दी जमली.
सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर गुड्डेवार, पत्रकार विनोद दोनाडकर यांना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागाला जिवंत पकडण्याचे आव्हाहन केले. गावातील युवक तरुणांनी नागाला पकडल्यानंतर त्याला वन विभागाच्या स्वाधीन करून निसर्ग मुक्त करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते, नंदकिशोर गुड्डेवार यांच्या समय सूचकतेमुळे नागाला जीवनदान मिळाले. त्यामुळे प्राणी मित्र,सर्पमित्र, व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वनरक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
यावेळी जंगल परिसरात कोब्रा नाग सापाला निसर्ग मुक्त करतांना वन विभागाचे वनरक्षक कोट्टावार, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर गुड्डेवार, पत्रकार विनोद दोनाडकर, पत्रकार रुपेश देशमुख,संदीप श्रीरामे, अभिषेक नन्नावरे, रंजीत अवसरे तसेच सर्पमित्र विवेक करंबेकर उपस्थित होत