ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावलहीरा व बोरगाव बु या जंगलामध्ये बैलावर वाघाचा हल्ला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा :- तालुक्यातील अतिदुर्गम भागात येत असलेल्या बोरगाव बु या, शिवारामध्ये वाघाची दहशत पाहायला मिळत आहे बोरगाव बु या गावातील सर्व जनावरे चारण्यासाठी कवडु धुर्व. नेहमीप्रमाणे नेत होता परंतु चार तारखेला सुमारे तीन ते चार च्या दरम्यान अचानक पणे जंगलामध्ये वाघ पाहायला मिळाला सर्व गावातील जनावरे चारणासाठी चारून घेऊन येत असताना अचानकपणे वाघ तिथे येऊन गेला व एका एका बैलावर अचानक पणे वार केला बैल जखमी झाला.

जशी वनविभागाला माहिती मिळाली तेव्हा सर्व वनविभागचे सर्व अधिकारी तात्काळ तिथे येऊन पंचनामा करण्यात आला सावलहीरा येथील वनरक्षक गेडाम साहेब हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते व बोरगाव बु व येरगव्हाण येथील वनरक्षक मडावी उपस्थित होते अदाजे त्या बैलाची अंदाजी किंमत 35 ते 40 हजार रुपये किंमत आहे त्याकरिता वनविभाग ने वाघाला तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी समस्त गावकाराची मागणी होत आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये