ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाघाच्या हल्ल्यात बैल गंभीर जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना – तालुक्यातील घाटराई येथील जंगलात वाघाने हल्ला करून बैलाला गंभीर जखमी केल्याची घटना सोमवार, ४ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
सदर बैल हा हातलोणी येथील शेतकरी हनुमंत कोरांगे यांच्या मालकीचा असून तो जंगलात चराई साठी नेण्यात आला होता. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घालत बैलाच्या मानेवर घाव घातला. या हल्ल्यात बैल गंभीररीत्या जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घटनेनंतर बैलावर प्राथमिक उपचार करण्यात आले.शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे हातलोणी, बोरगाव, घाटराई परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे.