ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सनराईज योगा ग्रुप तर्फे मैत्री दिवस उत्साहात साजरा

विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

श्रावण सोहळा स्पेशल म्हणून सनराईज ग्रुप च्या संचालिका कुंतल चव्हाण यांच्या माध्यमातून दिनांक ३ ऑगस्ट रोजी मैत्री दिनाचे औचित्य साधून मॅच-स्टिक कॉम्पिटेशन, कपल डान्स कॉम्पिटेशन आणि मिस हरियाली अश्या विविध स्पर्धांचे आयोजन महात्मा गांधी विद्यालय च्या सभागृहात करण्यात आले होते.

या कार्यकमाच्या अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त प्राचार्य सौ.स्मिता चिताडे होत्या,तर प्रमुख पाहुणे सौ. ममता सिंग, आदर्श हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ सौ मंजुषा मत्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ कीर्तिमाला आगलावे होत्या सर्वांनी मोलाचे मार्गदर्शन केले, मॅच-स्टिक स्पर्धेचे परीक्षण सौ.कीर्तीमाला आगलावे आणि सौ.मंजुषा मत्ते यांनी केले.

तसेच कपल डान्स स्पर्धेचे परीक्षण प्रा बाळू उमरे आणि श्री.संदीप महाकुलकर यांनी केले.

या स्पर्धेचे सूत्रसंचालन सौ.अंजू ढेंगळे यांनी यांनी केले. मॅच-स्टिक स्पर्धेचे प्रथम स्थान सौ.अंजू विश्वास, द्वितीय सौ.पल्लवी इंगोले आणि तृतीय सरोज मडावी. यांनी पटकाविले

तसेच कपल डान्स स्पर्धेत प्रथम सौ.सपना येत्रे आणि सौ.शुभांगी बोंडे,द्वितीय सौ.अंजू विश्वास आणि सौ. भारती राठोड तसेच तृतीय क्रमांक सौ.अनिता बुजाडे आणि सौ.सुरेखा जवादे . यांना मिळाला

मिस हरियाली या स्पर्धेची विजेती सौ.प्रिया तासलवार.ठरली

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती संध्या निखाडे यांनी केले आणि माणसाने माणसाशी माणसासम वागणे या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 मैत्री दिवस निमित्ताने सनराईज ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये