ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मा.आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासोबत वाहतुक अधिकारी व ऑटोरिक्षा पदाधिकारी यांची संयुक्‍त बैठक संपन्‍न

चांदा ब्लास्ट

महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्‍यावतीने आज दि. ०२ ऑगस्‍ट २०२५ रोजी आ. सुधीर मुगंटीवार यांच्‍यासोबत संयुक्‍त बैठक घेण्‍यात आली. बैठकीला वाहतुक अधिकारी पाटील साहेब ऑटोरिक्षा संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्‍हाध्‍यक्ष मधुकर राऊत, माजी नगरसेवक अजय सरकार व सर्व ऑटोरिक्षा चालक मालकांच्‍या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्‍यात आले. बैठकीला सर्व ऑटोरिक्षा चालकांनी आपआपले विषय मांडले. त्‍यावर आ. मुनगंटीवार यांनी मधला मार्ग काढून सर्व ऑटोरिक्षा चालकांना न्‍याय मिळेल अशा सुचना वाहतुक अधिकारी पाटील साहेब यांना दिल्‍या. व ते मागण्‍या पूर्ण करुन असा विश्‍वास दिला. त्‍याबद्दल आ. मुनगंटीवार यांचे सर्व ऑटोरिक्षा चालकांनी बैठकीमध्‍ये आ. मुनगंटीवार यांचे कौतुक केले. व वाहतुक अधिकारी यांना शुभेच्‍छा दिल्‍या.

संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्‍हाध्‍यक्ष मधुकर राऊत, जिल्‍हा सचिव सुनिल धंदरे, जिल्‍हा उपाध्‍यक्ष विनोद चन्‍ने, कोषाध्‍यक्ष किशोर वाटेकर, प्रसिध्‍दी प्रमुख राजु मोहुर्ले, विश्‍वेवर राऊत, राकेश पवार, महेश ढेकरे, जनार्धन गुंजेकर, सचिन बांगडे, अरविंद उमरे, राजु यादव, भैय्याजी मोहुर्ले, खुशाल साखरकर, नरेंद्र अस्‍वले, प्रदिप वरभे, सुनिल देऊळकर, विजय मडावी, अंकुश कौराते, विलास बावणे, विलास जुमडे, प्रदिप शिवनकर, वासुदेव कुबडे, रमेश मुन, मुशीर शेख या बैठकीला सर्व ऑटोरिक्षा चालकमालक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये