मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा ऑटोरिक्षा संघटनेतर्फे वाढदिवसानिमित्त सत्कार

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालकमालक संघटनेच्या वतीने ३० जुलै २०२५ रोजी मा.आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३० ऑटोरिक्षा चालकांनी रक्तदान केले. चांगुनाबाई मुनगंटीवार म्हाडा कॉलनी दाताळा रोड चंद्रपूर येथे वृक्षारोपन करण्यात आले. त्याची सविस्तर माहीती मा.आ. सुधीर मुनगंटीवार यांना देण्याकरीता ऑटोरिक्षा संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले.
दि. ०२ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री यांचे स्वागत यांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्व ऑटोरिक्षा चालकांनी जयघोष करत सत्कार करण्यात आला. या सत्काराप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत, जिल्हा सचिव सुनिल धंदरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद चन्ने, कोषाध्यक्ष किशोर वाटेकर, प्रसिध्दी प्रमुख राजु मोहुर्ले, विश्वेवर राऊत, राकेश पवार, महेश ढेकरे, जनार्धन गुंजेकर, सचिन बांगडे, अरविंद उमरे, राजु यादव, भैय्याजी मोहुर्ले, खुशाल साखरकर, नरेंद्र अस्वले, प्रदिप वरभे, सुनिल देऊळकर, विजय मडावी, अंकुश कौराते, विलास बावणे, विलास जुमडे, प्रदिप शिवनकर, वासुदेव कुबडे, रमेश मुन, मुशीर शेख या प्रसंगी उपस्थिती होते.