ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे एक दिवसीय विद्यार्थी प्रबोधन मेळाव्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर-लोकमान्य टिळक पुण्यतिथी तथा साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे “मानसिक आरोग्य सुरक्षा तसेच मासिक पाळी आणि स्त्रियांचे आरोग्य”या विषयावर एकदिवसीय विद्यार्थी प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट चे जिल्हा समन्वयक अगस्तीन गायकवाड सर आणि प्रगती चुनारकर मॅडम उपस्थित होते.

    मानसिक आरोग्य सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करतानाअगस्तीन गायकवाड यांनी सांगितले की,सध्याच्या काळात विद्यार्थी मोबाईल व सोशल मीडियाचा अतिवापर करीत आहेत.त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन ते व्यसनांच्या आहारी जात आहेत. ते गुन्हेगारी प्रवृत्ती कडे वळत आहेत.वयात येताना विद्यार्थ्यांना घरातून, समाजातून योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांची नीतिमत्ता ढासळत आहे.शिस्त,शिष्टाचार चा अभाव त्यांच्यामध्ये दिसून येत आहे,त्यामुळे त्यांच्या बौद्धिक वाढीवर परिणाम होत आहे म्हणून विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन देण्याची गरज आहे.

   मासिक पाळी व स्त्रियांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करताना प्रगती चुनारकर यांनी सांगितले की,मासिक पाळी च्या काळात आई, बहीण, पत्नी, मुलगी या घरातील महिलांची काळजी घरातील सर्व सदस्यांनी घेणे गरजेचे आहे.कुठलाही संकोच न ठेवता पालकांनी आपल्या मुलामुलींना तारुण्यात होणाऱ्या शारीरिक बदलाची माहिती दिली पाहिजे. मुलींनी मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखली पाहिजे आणि त्याविषयी असणाऱ्या अंधश्रद्धा दूर केल्या पाहिजे.

     या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ आनंदरावजी अडबाले उपस्थित होते त्यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शारीरिक आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करून नियमित व्यायाम करावा. कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून संस्था सचिव प्रा. नामदेवरावजी बोबडे उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतातुन अशाप्रकारचे विद्यार्थी शिबिराचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे,प्रा. विजय मुप्पीडवार,प्रा.नितीन टेकाडे उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. प्रशांत खैरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नितीन सुरपाम यांनी तर आभार प्रा. सोज्वल ताकसांडे यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा अशोक सातारकर, प्रा. जहिर सय्यद, प्रा दिनकर झाडे, प्रा जयश्री ताजने,प्रा. राजेश बोळे, प्रा. प्रवीण डफाडे,प्रा अनिल मेहरकुरे, प्रा. शिल्पा कोल्हे, करण लोणारे, सीताराम पिंपळशेंडे आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये