माधुरीला कोल्हापुरात आणण्यासाठी सकल जैन समाजाने दिले पालकमंत्र्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोल्हापूरच्या गौरवशाली परंपरेचा भाग असलेली माधुरी हत्तीनी पुन्हा नांदणी,कोल्हापूर येथे आणावी, या मागणीसाठी सकल जैन समाज सोलापूर यांच्यातर्फे पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर यांना निवेदन देण्यात आले यावेळी त्यांच्या समावेत आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे हेही उपस्थित होते.
जैन समाजाच्या वतीने सांगण्यात आले की, माधुरी हत्तीनी हे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे प्रतीक आहे. अनेक दशके हत्तीनी धर्मकार्यात सहभागी होत असे, ज्यामुळे श्रद्धा, शिस्त आणि सामाजिक एकता यांचे दर्शन घडत होते. मात्र काही कारणांमुळे ही परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न केला असून. ती अबाधित ठेवावी यासाठी निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी सुनील गांधी अध्यक्ष आदिनाथ जैन मंदिर सोलापूर श्याम पाटील, अध्यक्ष अतिशय क्षेत्र चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर कुमठे एडवोकेट साधना सांगवे संयोजिका जैन प्रकोष्ट मनीष शहा कार्यकारणी सदस्य सकल जैन समाज, सीमा भंडारी,प्रथमेश कासार हे उपस्थित होते