डॉ. अन्नाभाऊ साठे यांची 105 वी जयंती कोरपणा नगरीत साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
मातंग समाज बहुउद्देशीय संस्था कोरपना व बहुजन संत महापुरुष सन्मान समिती कोरपणा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणीय व्यक्तिमत्व विचारवंत साहित्य कवी कलावंत प्रबोधनकार व समाज सुधारक साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अन्नाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती पाशा पाटील लेआउट मध्ये साजरी करण्यात आली तसेच नवनियुक्त संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर विजय बावणे यांच्या वाढदिवस व सत्कार सोहळा मातंग समाज बहुउद्देशीय संस्था कोरपना यांच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी लक्ष्मण कोंगे अध्यक्ष, मनोहर शिंदे उपाध्यक्ष, रमेश गोतावडे कोषाध्यक्ष, दशरथ तोगरे, प्रभाकर गेडाम समाजसेवक, हरिदास गौरकार समाजसेवक, लीलाधर पाटील, सुरेंद्र आडते, मानसिंग जाधव, विशाल गायमुखे, विजय शिंदे,रमेश कोटंबे, इंजिनीयर ढगे, बालाजी डुकरे, नर्सिंग गोतावडे,दिगंबर भालेराव,किसन केसरे ,नवनाथ टोंगरे यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते