ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- चिंतामणी महाविद्यालय, घुग्घूस च्या वतीने असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आसुटकर यांनी आपल्या अध्यक्ष स्थानावरून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडत त्यांच्या कर्तुत्वाला अभिवादन केले.

महाविद्यालयातील प्राध्यापक वृंदांनी बाळ गंगाधर टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या ऐतिहासिक कार्याला उजळा देत त्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. माधव कांडणगिरे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष गोहोकार यांनी केले तर आभार डॉ. महेंद्र कुंभारे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये