काँग्रेस नेते विजयराव बावणे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचे अनोखे उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक व जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष विजयराव बावणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मित्र परिवारातर्फे समाजसेवेचा एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. कोरोनानंतर आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता आणि सुरक्षिततेचे महत्त्व अधिकच वाढले असून, त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी नागरिकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविले आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक अडचणी लक्षात घेऊन विजयराव बावणे मित्रपरिवार यांच्या तर्फे फवारणी स्प्रे टँकर आणि शवपेटी नगरपंचायत, कोरपना इथे भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली. या उपकरणांचा वापर शहर स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. वृक्ष संवर्धनाच्या दृष्टीने शहरात वृक्षारोपण ही करण्यात आले.
त्याचप्रमाणे, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसाळी छत्र्यांचे वाटप देखील करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थी पावसातही नियमितपणे शाळेत जाऊ शकतील.
या सामाजिक उपक्रमांमुळे विजयराव बावणे यांचं कार्य केवळ राजकीय क्षेत्रापुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकासाठी उपयोगी आणि प्रेरणादायी आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
त्यांच्या मित्र परिवारातर्फे राबविलेल्या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने नगरवासीयांची उपस्थिती होती.