सिंदी मेघे वर्धा येथे विक्री करीता आणलेली विदेशी दारू जप्त
एकुन 8 लाख 16 हजार 600 रू चा माल केले जप्त.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 18.02.2024 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांनी शिवजयंती निमीत्य सिंदी मेघे वर्धा येथे विक्री करीता आनलेली विदेशी दारू गोपनिय माहीती काढुन थुल लेआउट सिंदी मेघे वर्धा येथे नाकेबंदी करून आरोपीतांवर प्रोव्हीशन रेड केला असता मौक्यावर 1) प्रदीप देविदासजी काबंळे वय 37 वर्ष रा. वार्ड न. 2 थुल लेआउट, सिंदी मेघे, वर्धा जि. वर्धा 2) कुनाल उर्फ आदी विनायक मांदाडे वय 29 वर्ष रा. वार्ड न. 2 थुल लेआउट, सिंदी मेघे, वर्धा जि. वर्धा यांचे ताब्यातुन एक जुनी वापरती पाढऱ्या रंगाची चारचाकी पांढऱ्या रंगाची मारूती सुजुकी कपंनीची स्वीफ्ट वाहन क्र एम.एच. 32 बी. 0958 त्या वाहनाचे डिक्की मध्ये व मधातील सिटवर वेगवेगळया कपंनीच्या देशी विदेशी व बियर दारूने भरलेल्या दारूच्या एकुन 10 पेटया असा एकुन जु. किंमत 8,16,600/-रू. चा माल अवैध्यरित्या मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आली.
सदर आरोपीतांना विदेशी दारूचा माल कोठुन आणला या बाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की सदर विदेशी दारूचा माल हा यवतमाळ जिल्हयातील कंळब येथील एम.पी.ट्रेडर्स नावाचे वाईन शॉप मधुन आणला आहे सदर वाईन शॉपचे मालक मनिष जयस्वाल रा. कळंब जि. यवतमाळ हे आहे. असे सांगीतल्याने एम.पी. ट्रेडर्स वाईन शॉप चे मालक यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असतांना सुध्दा वर्धा जिल्हातील आरोपीतांना यास दारूचा माल देवुन त्यास सहकार्य केल्याने त्याचे कृत्य म.दा.का. कलम 82 प्रमाणे होत असल्याने सदर गुन्हयात बार मालक यास आरोपी बनविण्यात आले आहे.
पोलीस स्टेशन रामनगर येथे आरोपीतांविरूध्द 1) अपराध क्रमांक 140/2024 कलम 65 अ ई, 77 अ, 82, 83, म.दा.का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. रामनगर येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री. रोशन पंडीत सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि. परवेज खॉन, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पो.शि, मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.



