वर्धा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2025-26 समारोप समारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचा तीन दिवसीय सोहळा आज, १९ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि शानदार समारंभासह संपन्न झाला. या स्पर्धेत, वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव, आणि पोलीस मुख्यालय या पाच विभागांतील एकूण १३० खेळाडू (पुरुष आणि महिला) सहभागी झाले होते.
पोलिस अधीक्षक श्री. अनुराग जैन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी यांसारख्या सांघिक खेळांसह १०० मीटर, २०० मीटर, ८०० मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक आणि भालाफेक यांसारख्या मैदानी स्पर्धांचाही समावेश होता.
या स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उप वनसंरक्षक, श्री. हरवीर (भा.व.से.) वर्धा जिल्हा उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्यांचा गौरव
उत्कृष्ट खेळाडू (पुरुष): चंद्रकांत वाघ, पोलीस मुख्यालय, वर्धा
उत्कृष्ट खेळाडू (महिला): मीनाक्षी सुरकार, पोलीस मुख्यालय, वर्धा
जनरल चॅम्पियनशिपः पोलीस मुख्यालय, वर्धा
या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंच्या मुलांनीही विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना विशेष ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. यामध्ये जलतरण, बॉक्सिंग, आणि मैदानी स्पर्धा, मर्दानी आखाडा यांसारख्या खेळांतील विजेत्यांचा समावेश होता.
त्यांची नावे :-
०१) ओम अरूण नागोसे, १ वय १२ वर्षे वर्ग ५ वा सेंट अॅन्थोनी राष्ट्रीय विद्यालय वर्धा
०२) आदिती घनश्याम ढोणे वय १४ वर्षे वर्ग ८ वा सेंट अॅन्थोनी राष्ट्रीय विद्यालय वर्धा
०३) रूद्र जयेशसिंग डांगे वय १३ वर्षे वर्ग ८ था, सेंट अॅन्थोनी राष्ट्रीय विद्यालय वर्धा
०४) कु. स्वरा संग्राम मोहीते वय १३ वर्षे वर्ग ६ वा भरत ज्ञान मंदीरम, वर्धा
०५) उविर मनोज कोरडे वय १२ वर्षे वर्ग ६ वा अग्रगामी कान्व्हेंट स्कूल,
०६) श्रावणी शरद इंगोले वय १५ वर्षे वर्ग ७ वा अग्रगामी कान्व्हेंट स्कूल, मसाळा
०७) ईश्वरी विक्रम काळमेघ, वय १३ वर्षे अल्फोन्सा कान्व्हेंट स्कूल सावंगी,
महिला पोलीस अंमलदार आशा जनकवार पो.मु वर्धा यांना ठाणे येथे झालेल्या “फॅशन शो इंडिया” यांचे कडून आयोजित राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेत मिसेस कॅटेगरी मध्ये प्रथम क्रमांक पटकावून मिसेस महाराष्ट्र सुपर मोडेल २०२५ हा किताब मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
सर्व विभागांच्या तुकड्यांनी शिस्तबद्ध संचलन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर क्रीडा स्पर्धा पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन (भा.पो.से.), अपर पोलीस अधीश सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, श्री पुंड भटकर पोलीस उपाधीक्ष (गृह), श्री चंदशेखर ढोले, श्री सुशील कुमार नायक, यांचे दिशानि राखीव पोलीस निरीक्षक शेख मजीद शेख बशीर, राखीव पोलीस उपनिरीक्षक गजानन खंड इन्चार्ज राजू उमरे तसेच मुख्यालयातील इतर कर्मचारी वर्ग यांनी पार पाडली.