ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पर्यावरणाचे रक्षक बना, भक्षक नको : डॉ.सत्य प्रकाश मेहरा

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात 'पर्यावरण शास्त्रावर' विशेष व्याख्यान

चांदा ब्लास्ट

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ,मुंबई चे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर येथे १७ सप्टेंबर रोजी ‘पर्यावरण शास्त्राचा परिचय’ या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हे व्याख्यान बी एससी पर्यावरण विज्ञान अभ्यासक्रमा अंतर्गत आयोजित करण्यात आले होते.यांत आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण तज्ज्ञ आणि कार्यकर्ते डॉ. सत्य प्रकाश मेहरा यांनी पर्यावरण संबंधी विविध विषयांवर उपस्थित विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.

आपल्या व्याख्यानात डॉ. मेहरा यांनी पर्यावरणाचा परिचय करून दिला. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या गैर वापरामुळे जलवायू परिवर्तन, हरितगृह प्रभाव, वाढते प्रदूषण आणि त्याचे दुष्परिणाम, जैवविविधतेला होणारे नुकसान,पर्यावरणीय असंतुलन या बाबींवर विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.यावेळी त्यांनी नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, सेंद्रिय शेती, हरित ऊर्जा वापर आणि वैविध्यपूर्ण जैविक प्रणालींचे महत्त्व पटवून दिले. डॉ. मेहरा यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी सक्रियपणे भूमिका बजावण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी उपस्थित बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ.राजेश इंगोले, समन्वयक डॉ वेदानंद अलमस्त उपस्थित होते. जैवविविधतेचे संगोपन करणे हे आपले नैतिक कर्तव्य असून नैसर्गिक साधनसंपत्तीचे होणारे नुकसान टाळणे गरजेचे आहे असे डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ,डॉ.पूजा मत्ते,प्रियंका मुलचंदानी,निहारिका सातपुते यांनी विशेष सहकार्य केले. या प्रसंगी सर्व प्राध्यापकवृंद व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये