ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषद गडचांदूरच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी तयारी पूर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता दि. ०२ डिसेंबर, २०२५ रोजी एकूण २८ मतदान केंद्रांवर १ नगराध्यक्ष व १९ नगरसेवक पदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. तसेच प्रभाग ८ च्या १ जागेकरिता दि. २० डिसेंबर, २०२५ ला मतदान होणार आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सदर निवडणुकीची मतमोजणी दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजतापासून नगर परिषद गडचांदूर कार्यालयात सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण ०५ मतमोजणी टेबल्स ठेवण्यात आलेली आहेत. फेरी क्र. १ ते ३ मध्ये प्रभाग क्रमांक ०१ ते ०५ यांची मतमोजणी करण्यात येणार आहे. फेरी क्र. ४ ते ६ मध्ये प्रभाग क्रमांक ०६ ते १० यांची मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक २ व ६ वगळता सर्व प्रभागांसाठी प्रत्येकी ०३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात येणार असून, प्रभाग क्रमांक २ व ६ करिता २ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रत्येकी एका मतमोजणी प्रतिनिधीस, संबंधित प्रभागाची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश देण्यात येईल.

दि. ०२ डिसेंबर, २०२५ ला आदर्श हिंदी प्राथमिक विद्यामंदिर मतदान केंद्र क्र. ९/२ येथे झालेल्या झालेल्या इकोएम तोडफोड प्रकरणी संबंधित व्यक्तीवर त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता व सदर प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे.

मतमोजणीच्या दिवशी नगर परिषद कार्यालया समोरून जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

तसेच मतमोजणीसाठी येणारे उमेदवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी वृंदावन हॉटेल च्यामागील ओपेन स्पेस येथे वाहनतळ (पाकिंग) व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व राजकीय पक्ष. उमेदवार व नागरिकांनी मत मोजणीच्या कालावधीत शांतता व शिस्त राखून कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी आखरे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये