टि- ११५ नरभक्षक वाघ अखेर जाळ्यात अडकला
पोंभूर्णा येथील कक्ष क्र.९३ येथे ट्रन्कुलाईज करून केले जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :- गोंडपिपरी तालुक्यातील चेक पिपरी व गणेश पिपरी येथे शेतशिवारात धुमाकूळ घालणारा व दोघांचा बळी घेणारा नरभक्षी टि-११५ वाघ अखेर पोंभूर्णा येथील कक्ष क्रमांक ९३ मध्ये ट्रन्कुलाईज करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील चेक पिपरी व गणेश पिपरी येथे शेतशिवारात धुमाकूळ घालणारा व दोघांचा बळी घेणारा नरभक्षी टि-११५ वाघाला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती.फार मोठा जनप्रक्षोभ निर्माण झाला होता.गोंडपिपरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
सदर वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत पण यश मिळाले नव्हते.त्यानंतर टि -११५ वाघ कथीतरित्या गायब झाल्याची चर्चा सुरु होती.अश्यात गेल्या तेरा दिवसांपासून पोंभूर्णा बिटात त्याचा वावर सुरू असल्याचे लक्षात येताच वनविभागाने वाघावर पाळत ठेवून होते.अखेर दि १८ डिसेंबरला संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पोंभूर्णा कक्ष क्रमांक ९३ मध्ये नरभक्षी टि-११५ वाघाला ट्रन्कुलाईज करून जेरबंद करण्यात आले. व वनविभागाचे वनविभागाच्या विश्रामगृह परिसरात आणून नंतर नरभक्षी वाघाला चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.
सदर वाघाला जेरबंद करण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे,वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकार,परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश नरसाळे,क्षेत्र सहाय्यक श्यामजी यादव,वनरक्षक प्रतिक बोबडे,तेजस चव्हाण व वनविभागाचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम केले आहे.
टि-११५ हा नरभक्षी वाघ साधारण साडेतीन वर्षांचा असून त्याचे वजन अडीच क्विंटल असल्याचे सांगण्यात येत आहे.
टि-११५ या वाघाने गोंडपिपरी उपक्षेत्रातील वाघाने चेक पिपरी व गणेश पिपरी येथील दोघांचा बळी घेतला होता.या घटनेचा तीव्र संताप व्यक्त करीत गोंडपीपरी येथील जनतेनी वन विभागाचे विरोधात रस्ता रोको आंदोलन केले होते.वन विभागाने मोहीम राबविली होती.मात्र साठ दिवसाचा कालावधी लोटून सुद्धा वाघ तावडीत सापडला नव्हता.अखेर त्याला पोंभूर्णा कक्ष क्रमांक ९३ मध्ये ट्रन्कुलाईज करून केले जेरबंद करण्यात आले.



