ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालय येथे शिक्षक पालक सभा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे चालू शैक्षणिक वर्षातील शिक्षक पालक सभा 31 जुलै रोजी संपन्न झाली.
सभेच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उप प्राचार्य प्रफुल्ल माहुरे, उपमुख्याध्यापक विजय डाहुले, पर्यवेक्षिका माधुरी मस्की, होत्या. या सभेत पालकांनी विविध प्रश्न विचारले समस्या मांडल्या, मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम यांनी सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे सांगितले.
सभेचे संचालन शिक्षक पालक संघाचे सचिव प्रा बाळू उमरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक पालक संघाच्या सहसचिव श्रीमती भारती घोंगे यांनी केले. सभेला शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.