ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय मध्ये वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
दिनांक 31 जुलै 2025 रोजी शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या एक पेड मा के नाम या अभियाना अंतर्गत आमच्या मोहसिनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ विद्यालय बल्लारपूर मध्ये शाळेचे संस्थापक जैनुद्दीन जव्हेरी सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर जैनुद्दीन सर यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व व काळाची गरज याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या वृक्षारोपण अभियान चे आयोजन इको क्लब तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका असमा खान मॅडम व पर्यवेक्षिका रच्चावार मॅडम व इतर सर्व शिक्षिका व शिक्षक त्यांनी केलेले आहे.
शाळेच्या प्रांगणामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी वृक्षारोपण करून एक पेड मा के नाम हे अभियान यशस्वी केले.