ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती तहसील कार्यालयात महसूल सप्ताहाला प्रारंभ

आमदार करण देवतळे यांच्या हस्ते महसूल सप्ताहाचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती तहसील कार्यालयात दिनांक १ पासून आमदार करण देवतळे यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी तहसीलदार राजेश भांडारकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार मनोज आकनूरवार, मधुकर काळे, सुधीर खांडरे, भाजप शहर अध्यक्ष सुनील नामोजवार, प्रशांत डाखरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उत्कृष्ट कार्य करणारे मंडळ अधिकारी समीर वाटेकर, अनिल दडमल, सह महसूल अधिकारी विनोद चिकटे, रवी तल्लरवार, खुशाल मस्के, प्रतिभा लोखंडे, श्रीकांत गीते, महसूल सहाय्यक समीक्षा पडगिलवार, शिपाई शांताबाई माणूसमारे, महसूल सेवक सुरज शेंडे यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

सदर सप्ताह ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तथा इतर नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये