ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरकुलाचा शेवटचा 30 हजारच्या हप्ता मंजूर

नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी मानले केंद्र व राज्यसरकारचे आभार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

 सावली शहरांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून घरकुलांची कामे सुरू आहे. अनेकांची घरे बांधकाम पूर्ण झाली मात्र शेवट चा 30 हजार रुपयांचा हप्ता मिळण्यास विलंब झाला होता. या संदर्भात अनेक घरकुल लाभार्थ्यांनी सावली नगरपंचायत चे विरोधी पक्ष नेते तथा भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, नगरसेविका नीलम सुरमवार,नगरसेविका शारदा गुरुनुले यांच्या कडे समस्या मांडली.

सदर घरकुल लाभार्थ्यांची समस्या लक्षात घेता न.प. विरोधी पक्ष नेते सतीश बोम्मावार यांनी सावली नगरपंचायत अंतर्गत जवळपास 70 ते 80 घरकुलांची शेवटची 30 हजार थकीत रक्कम देण्यात यावी अशी मागणी तत्कालीन पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच आताचे पालकमंत्री अशोकजी उईके,माजी खासदार अशोकजी नेते यांच्या मार्फतीने सरकार कडे केली होती. तसेच जुन महिन्यातही पालकमंत्री यांची चंद्रपूर येथे भेट घेवून थकीत रक्कम देण्याची मागणी केली.

मोठ्या प्रमाणात काही घरकुल लाभार्थी हे कर्ज काढून तसेच हातूउसने घेतलेले होते. मात्र संबंधित निधीच येत नसल्यामुळे मुख्याधिकारी व संबंधित विभागचे कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. नगरसेवक सतीश बोम्मावार यांच्या सह मुख्याधिकारी यांनीही या संदर्भात पाठपुरावा केलेला होता.

 अखेर शासनाने संबंधित मागणी लक्षात घेता सावली शहरातील नगरपंचायत अंतर्गत घरकुल लाभार्थी यांचा शेवटचा थकीत असलेला 30 हजार रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला.त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,ना. नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री अशोकजी उईके,माजी मंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार,आमदार बंटीभाऊ भांगडीया,माजी खासदार अशोकजी नेते,माजी आमदार अतुलभाऊ देशकर,राज्य सरकार व केंद्र सरकार चे आभार मानले असून गरिबांना पूर्ण घरकुल लाभ दिल्याबद्दल सरकार भाजपा सावली तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार यानी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये