व्हॅली फाउंडेशन बेंगलोरच्या “भारत स्वाभिमान पुरस्कार २०२५” डॉ ज्ञानेश हटवार यांना जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथील यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी येथिल प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांना नुकताच व्हॅली फाउंडेशन बेंगलोरचा भारत स्वाभिमान पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती व्दारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे २५ वर्षापासून कार्यरत असलेले मराठी चे प्राध्यापक डॉ ज्ञानेश हटवार यांना व्हॅली फाउंडेशन बेंगलोर मार्फत दिला जाणारा सन्मानाचा भारत स्वाभिमान पुरस्कार २०२५ नुकताच आँनलाईन सभेत जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार बंगलोर येथे आयोजित होणाऱ्या भव्य शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ ज्ञानेश हटवार यांना हा पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल दिला जाणार आहे. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव प्रा. डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव प्रा. डॉ विशाल शिंदे, विश्वस्त डॉ जयंत वानखेडे, प्राचार्य डॉ सुधीर मोते तसेच समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.