चारगाव येथे अंगणवाडी उद्घाटन सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
आजच्या कॉन्व्हेन्ट संस्कृतीत ग्रामीण व मागास भागात शिक्षण व सुसंस्कार करणार केंद्र म्हणून अंगणवाडी ची भूमिका महत्वाची ठरते आहे. पोषण आहार ते बाल संगोपन सुदृढ व्हावे तसेच चिमुकल्यांना उत्तम संस्कारीत करण्यात आंगनवाडी ची भूमिका मोलाची आहे.
दि.२८ रोज सोमवारला तेलवासा चारगाव गट ग्रामपंचायतचे सरपंच आकाश मोरेश्वर जुनघरे यांच्या हस्ते तसेच ग्रामसेवक सुनील जाधव, उपसरपंच पांडुरंग वांढरे यांचे उपस्थितीत चारगाव येथे अंगन वाडी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी बोलताना अंगणवाडी सेविकांनी अधिकाधिक बालकांची काळजी घेऊन त्यांना सुदृढ व संस्कारीत करण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या कल्पना नाकाडे, वंदना ठाकरे, शालिंदा किंनाके, अनिता बोबडे, सदस्य नितीन नगराळे, नलेश्वर पेंदाम,शिक्षक. वसंत जांभूळे यांचे सह अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.